प्रलंबित महसूल कामे मार्गी लागणार

प्रलंबित महसूल कामे मार्गी लागणार

Published on

भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : महसूल विभागाच्या वतीने भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला शनिवारी सुरुवात करण्यात आली. भिवंडी तहसील कार्यालयाच्या वतीने या शिबिराचे उद्‍घाटन महापालिकेचे महापौर नारायण चौधरी यांच्या हस्ते पोलिस संकुल सभागृहात पार पडले.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात नागरिकांना विविध महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, दाखले आदी मिळून एकूण १५ प्रकारच्या सेवा या शिबिरांमधून नागरिकांना दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला तहसीलदार अभिजित खोले, नगरसेवक परेश चौघुले, नायब तहसीलदार आदेश म्हात्रे यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी; तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी महापौर नारायण चौधरी यांनी, भिवंडी शहर व तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या या संधीचा लाभ घ्यावा. प्रलंबित असलेली महसुली कामे या शिबिरांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. दरम्यान, भिवंडी तालुक्यातील आठ मंडळ अधिकारी क्षेत्रांमध्ये पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत या समाधान शिबिर घेण्यात येणार आहे. गावपातळीवर याबाबत जनजागृतीही केली असून नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अभिजित खोले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com