महिला दिनानिमित्त ‘थिओब्रोमा’चा खास उपक्रम
महिला दिनानिमित्त ‘थिओब्रोमा’चा खास उपक्रम
मुंबई, ता. ७ : महिला दिन हा स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचा उत्सव मानला जातो. तिची ताकद, कोमलता, महत्त्वाकांक्षा आणि ममत्व या सर्व गुणांचा गौरव करण्यासाठी थियोब्रोमा या लोकप्रिय पॅटिसरी आणि चॉकलेट ब्रँडने महिला दिनानिमित्त खास लिमिटेड-एडिशन गोड पदार्थांची मालिका सादर केली आहे.
‘मेड फॉर मोर’ या संकल्पनेवर आधारित या विशेष कलेक्शनमध्ये विविध चवी आणि टेक्स्चरचा आकर्षक मिलाफ करण्यात आला आहे. स्त्रीच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच या गोड पदार्थांमध्ये ठसठशीत आणि नाजूक, समृद्ध आणि संतुलित अशा फ्लेवर्सचा सुंदर संगम पाहायला मिळतो. यामध्ये रास्पबेरी व्हॅनिला केक, महिला दिनविशेष ब्राऊनी, गिफ्ट हॅम्पर बॅग्स यांचा समावेश आहे. घरगुती रास्पबेरी कम्पोट, क्रीमी कस्टर्ड आणि व्हॅनिला स्पाँजचे थर असलेला रास्पबेरी व्हॅनिला केक चवीला आंबट-गोड असून, व्हाईट चॉकलेट ग्लेझ आणि बटरक्रीम फुलांनी सजवलेला आहे. चॉकलेटपासून बनवलेली अंडेविरहित चोको-चिप ब्राऊनी तसेच रेड व्हेल्वेट आणि चॉकलेट फ्लेवर्समधील कपकेक्स महिला दिनाच्या खास संदेशासह उपलब्ध आहेत. याशिवाय ब्राऊनी, कुकीज आणि विविध हस्तनिर्मित गोड पदार्थांचा समावेश असलेले गिफ्ट हॅम्पर्सही तीन वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

