सशक्तीकरणासह सुरक्षेवर भर - महापौर शर्मिला पिंपोळकर
सशक्तीकरणासह सुरक्षेवर भर
महापौर यांचा महिला दिनी विशेष संकल्प
ठाणे, ता. ७ ः शहराचा प्रथम नागरिक होण्याचा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संधी दिल्याने शहराचा विकास अधिक जोमाने करण्याचा माझा मानस आहे. सर्वसामान्य महिलेला मिळालेली ही संधी सर्वच सामान्य महिलेसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.
शर्मिला पिंपोळकम्हणाल्या की, जागतिक महिला दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून, तो महिलांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आज महिलांनी राजकारण, शिक्षण, विज्ञान, उद्योग आणि सामाजिक कार्य अशा प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र, हा दिवस आपल्याला एका वास्तवाची जाणीवही करून देतो की, आजही अनेक ठिकाणी महिलांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महिलांना अधिक संधी, सुरक्षितता आणि सन्मान मिळावा यासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. शिक्षण, आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या जोरावर तुम्ही कोणतेही शिखर गाठू शकता. यशाकडे झेपावताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका. जेव्हा समाजातील प्रत्येक महिलेला सन्मान आणि समान संधी मिळेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने कुटुंब, समाज आणि देश सक्षम होईल. आपण सर्वांनी एकमेकींना साथ देऊन सामर्थ्यवान बनावे, हीच सदिच्छा, अशा शुभेच्छा शर्मिला पिंपोळकर यांनी दिल्या.
सुरक्षिततेसाठी स्मार्ट पावले
१ भविष्यात ठाणे शहराच्या महापौर म्हणून महिलांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि स्वावलंबनासाठी विशेष पावले उचलणार आहोत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, अधिक प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यावर भर असेल.
२ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील.
३ महिलांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी शिबिरे आणि शहरात स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देऊ, असेही त्यांनी सांगितले
थेट संवादातून साजरीकरण
यावर्षीचा महिला दिनी मी थेट महिलांशी संवाद साधून आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन साजरा करणार आहे. आरोग्य, शिक्षण आणि सशक्तीकरणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

