लग्नाआधीच गोंधळ; तरुणाला अटक तरुणीच्या तक्रारीवरून पोक्सो व बलात्काराचा गुन्हा दाखल
लग्नाआधीच गोंधळ; तरुणाला अटक
तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : डोंबिवलीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून ब्लॅकमेल केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली. तरुणीशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या तरुणाला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. अरमान शेख असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तपासावरून त्याच्याविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवलीत राहणारी पीडित तरुणी ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, ती शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अल्पवयीन असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची शेख याच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि जवळपास तीन वर्षे दोघांमध्ये संबंध होते. दरम्यान, तरुणी १८ वर्षांची झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी (ता. ६) तरुणी भिवंडी येथे गेली. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुस्लिम पद्धतीने लग्न करण्यासाठी अरमान शेख याने काझी व साक्षीदारांना बोलावून सर्व तयारी केली होती; मात्र याची माहिती मिळताच काही संघटनांचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले आणि यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली; मात्र दोघेही डोंबिवलीतील असल्याने शांतीनगर पोलिसांनी त्यांना पुढील कारवाईसाठी विष्णूनगर पोलिस ठाण्यात पाठविले. यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख याच्याविरोधात पोक्सो तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तक्रारीत आरोपीने मैत्री करून शारीरिक संबंध ठेवले तसेच ब्लॅकमेल करून लग्नासाठी दबाव टाकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विष्णूनगर पोलिसांनी अरमान शेख याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

