गॅस दरवाढीवर राष्ट्रवादी आक्रमक

गॅस दरवाढीवर राष्ट्रवादी आक्रमक

Published on

गॅस दरवाढीवर ‘चुल्हा जलाओ’ आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच शिजवला भात

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढविल्याचा आरोप शासनावर करून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आज अनोखे आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून त्यावर भात शिजवण्याबरोबरच भाकरी भाजून या दरवाढीचा निषेध करण्यात आला.
इराण-इस्राईलचे युद्ध सुरू असून त्याचे परिणाम आता भारतातही दिसू लागले आहेत. भारतात घरगुती तसेच व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. १४.३ किलोच्या घरगुती गॅसची किंमत ६० रुपयांनी तर, व्यावसायिक सिलिंडरची किंमत ११५ रुपयांनी वाढली आहे. हे बदल ७ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, इराण-इस्राईल युद्धाचे कारण पुढे करत शासनाने घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रुपयांनी वाढविल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने अनोखे आंदोलन केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिलाध्यक्षा मनीषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चुल्हा जलाओ’ आंदोलन केले.

आंदोलकांनी या वेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून, भाकरी भाजून दरवाढीचा निषेध केला. अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे. त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. युद्धाचा अंदाज असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही, यावरून या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत, हे स्पष्ट झाले आहे, असे मनोज प्रधान म्हणाले. या सरकारने युद्धाच्या नावाखाली ही दरवाढ केली. ही दरवाढ म्हणजे भारतीय जनतेची लूट आहे. सरकारने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी मनीषा भगत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com