भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची निदर्शने
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मागण्यांवर सरकारकडून कोणताही समाधानकारक निर्णय न घेतला गेल्याने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्याप तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही, तसेच दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात महसूलमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने राज्यभरात भूमी अभिलेख कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ७) निदर्शने केली.
तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, सुधारित आकृतीबंध भूकरमापक व परिरक्षण भूकरमापक यांच्या वाढीव पदांसह मंजुरी द्यावी, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता ठरवून तो वेतनामध्ये समाविष्ट करावा, इतर विभागातील अधिकाऱ्यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने त्यांना या विभागात बदली अथवा प्रतिनियुक्ती देऊ नये तसेच विभागाचे खासगीकरण करू नये, अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली १८ फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या टप्प्यांवर आंदोलन करण्यात आले आहे. मोजणी साहित्य कार्यालयात जमा करणे, असहकार आंदोलन, काळ्या फिती लावून निषेध नोंदवणे, सामूहिक रजा आंदोलन, आक्रोश आंदोलन केल्यानंतर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परंतु या आंदोलनामुळे तालुका स्तरावर अनेक नागरिकांची जमीन मोजणीची कामे रखडल्याने अनेकांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, भिवंडी भूमी अभिलेख विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन खासदार सुरेश म्हात्रे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना देऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

