पनवेलमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत 38 वर्षीय पादचाऱयाचा मृत्यू

पनवेलमध्ये पाण्याच्या टँकरच्या धडकेत 38 वर्षीय पादचाऱयाचा मृत्यू

Published on

टँकरच्या धडकेत
पादचाऱ्याचा मृत्यू
पनवेल, ता. ७ (वार्ताहर) : उसर्ली गाव परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला समोरून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी १०च्या सुमारास घडली. पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज रामजी कांबळे (३८) असे असून, उसर्ली गाव येथील घरकुल सोसायटीत तो राहत होता. मनोज हा नेहमीप्रमाणे आपल्या घरातून कामावर जाण्यासाठी पायी निघाला असताना इच्छापूर्ती इमारतीजवळ समोरून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरने मनोज याला धडक दिली. या अपघातात मनोज गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com