जेएनपीएमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

जेएनपीएमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

Published on

जेएनपीएमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी मराठी ही भारतातील प्राचीन व समृद्ध साहित्यिक परंपरा लाभलेली भाषा असून केंद्र सरकारने तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरविल्याचे नमूद केले.
महाव्यवस्थापक (प्रशासन) व सचिव मनिषा जाधव यांनी प्रास्ताविक करत पंधरवड्यादरम्यान आयोजित विविध स्पर्धांची माहिती दिली. या निमित्ताने कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शुद्धलेखन, कथालेखन, निबंध, भाषण, कविता वाचन, प्रश्नमंजुषा, शब्दकोडे, अंताक्षरी व गीत गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठीही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या पंधरवड्यात सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांचा ‘मिश्किली आणि कविता’ हा कार्यक्रम तसेच डॉ. अरुंधती भालेराव यांचे ‘पाडगावकरांच्या कविता’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले. याशिवाय संतोष तारे व रती जठार यांनी ‘जागर मराठीचा’ कार्यक्रम सादर केला. मराठी खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘आनंद मेळावा’ही आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष रवीश कुमार, बोर्ड सदस्य, विभागप्रमुख तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संजय पाटील, संतोष तारे व पूजा म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com