सायन पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी होणार खुला
सायन पूल १५ ऑगस्टला खुला होणार
अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः सायन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल १५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी स्थायी समितीत दिली. या पुलाच्या बांधकामाचा मूळ खर्च ४२ कोटी ६३ लाख ८९० होता. तो आता ४९ कोटी ९६ लाख ४३३ रुपयांवर गेल्याची बाब सदस्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली.
सायन पुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी खर्चात सात कोटींनी वाढ झाल्याचा मुद्दा स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित करत पूल वाहतुकीसाठी कधीपर्यंत खुला होणार, असा सवाल केला. पुलाचे काम वेगाने सुरू असून सायन पूल १५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.
मध्य रेल्वे मार्गावर असलेला ब्रिटीशकालीन ११० वर्षे जुना पूर्व आणि पश्चिम भागास जोडणारा हा सायन पूल धोकादायक झाल्याने तो पाडून २०२४ पासून पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. सायन रेल्वे स्थानकावरील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेने पालिकेकडे सोपवले आहे. हा पूल रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधून जात असल्याने त्याच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रेल्वेने दिला होता. या कामासाठी येणारा पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वेमार्फत दिला जाणार आहे; मात्र पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम मुंबई महापालिकेने करावे, असे मध्य रेल्वेने स्पष्टपणे कळविले आहे. त्यामुळे पोहोच रस्त्याचा खर्च पालिका प्रशासन करणार आहे.
प्रशासनाची तारीख पे तारीख
सायन पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते; मात्र आता पूल खुला करण्याबाबत नवीन तारीख समोर आली असून १५ ऑगस्टपासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे विपीन शर्मा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

