जंगल संवर्धनाचा डोंगरीतून नारा

जंगल संवर्धनाचा डोंगरीतून नारा

Published on

जंगल संवर्धनाचा डोंगरीत नारा
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मेळावा
कासा, ता. ८ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील डोंगरी पाडा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कष्टकरी संघटनेतर्फे महिला मेळावा घेण्यात आला. महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी झालेल्या कार्यक्रमात ‘जंगलावरील महिलांचा हक्क’ विषयावर चर्चा करण्यात आली.
महिलांचे जंगलाशी असलेले घट्ट नाते, जंगल संवर्धनातील भूमिकेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात जंगलातील विविध भाज्या, उपयुक्त झाडे, औषधी वनस्पती, वनफळे तसेच गावाची माहिती, लोकसंख्येबाबत सविस्तर लेखन करण्यात आले आहे. या माध्यमातून जंगल, महिलांमधील परस्पर संबंध अधोरेखित केले. या वेळी नगरसेविका प्रियदर्शिनी दुबळा ठाकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यशस्वी महिलेच्या पाठीशी पुरुष उभा असतो, तसाच यशस्वी पुरुषाच्या पाठीशीही महिला असते. त्यामुळे महिलांचा सन्मान आवश्यक आहे. महिलांनी शिक्षण अर्धवट सोडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. तर सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता श्रीवास्तव यांनी जंगलांमुळे मानवजातीचे अस्तित्व टिकल्याचे सांगितले. या वेळी वाढती जंगलतोड, विविध प्रकल्पांमुळे होणारा पर्यावरणीय विनाश, समाजावर होणारे परिणामावर भाष्य करणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com