विरार ते पालघर प्रवास निर्विघ्न

विरार ते पालघर प्रवास निर्विघ्न

Published on

विरार ते पालघर प्रवास निर्विघ्न
नारंगी जेट्टी रस्त्याचे भूमिपूजन, कोंडी फुटणार
विरार, ता. ८ (बातमीदार) ः वसई-विरार परिसरातील महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नारंगी जेट्टी परिसरातील रस्त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. या कामाचे भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यामुळे विरार ते पालघर प्रवास निर्विघ्न होणार आहे.
विरार पश्चिमेतील नारंगी जेट्टीवरून नारंगी-खारवाडेश्री, जलसारपर्यंत रो-रो फेरीसेवा सुरू करण्यात आली आहे. या फेरीमुळे विरार ते पालघर प्रवास हा १५ ते २० मिनिटांवर आला आहे. तसेच अहमदाबाद महामार्गावरील कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे; पण विरारहून नारंगी जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे भाजपचे आमदार राजन नाईक यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार जेट्टीवरील रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी पाच कोटी ६६ लाख तसेच विविध सुविधांसाठी तीन कोटी ९० लाखांचा निधी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com