विधवा महिलांना रेशन किटचे वितरण

विधवा महिलांना रेशन किटचे वितरण

Published on

विधवा महिलांना रेशन किटचे वितरण
मालाड, ता. ८ (बातमीदार) : लाइट ऑफ होप फाउंडेशनच्या वतीने श्री हिरालाल मगनालाल दोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने गोरेगाव (पश्चिम) येथील भगतसिंगनगर क्रमांक एक परिसरातील गरजू व वंचित ६० विधवा महिलांना एक महिन्यासाठी आवश्यक असलेल्या ड्राय रेशन किटचे वितरण करण्यात आले.
प्रत्येक रेशन किट महिलांच्या मासिक अन्नगरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले होते. त्यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, चहा, डाळ आणि तेल यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. स्वतःचा उदरनिर्वाह करणे कठीण असलेल्या विधवा महिलांना अन्नसुरक्षा आणि आधार देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या मदतीमुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उदार दाते, सहकार्य करणाऱ्या संस्था तसेच स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक गरजू महिलांच्या जीवनात आशा आणि दिलासाचा किरण निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com