वाड्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा शुभारंभ
वाड्यात महाराजस्व अभियानाचा शुभारंभ
वाडा, ता. ८ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियाना’चा मंडळस्तरीय शुभारंभ वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला आहे. या अभियानाला कुडूस मंडळ परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळस्तरावर हे अभियान राबविण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना विविध प्रकारच्या १५ शासकीय सेवांचे दाखले जागेवरच उपलब्ध करून देण्यात येणार असून तक्रारींचे तत्काळ निवारणही करण्यात येणार आहे.
मार्च महिन्यात शनिवारी (ता. ७) याचे आयोजन झाले, आता पुढील शनिवारी (ता. १४) व त्यानंतर एप्रिल महिन्यात १० व १७ तारखेला अशी शिबिरे प्रत्येक मंडळस्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. वाडा तालुक्यातील कुडूस मंडळस्तरीय शिबिर कुडूस ग्रामपंचायत कार्यालयात पार पडले. या कार्यक्रमास भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप चव्हाण, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गटविकास अधिकारी वैभव शिंदे, निवासी नायब तहसीलदार रणजीत निंबाळकर, नायब तहसीलदार सुनील लहांगे, कुडूसचे सरपंच राजेंद्र कोंगिल, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, माजी उपसरपंच गिरीश चौधरी, मनेश पाटील, सचिन पाटील, अल्पेश जाधव, रोशन पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी सीमा पष्टे, ग्राम महसूल अधिकारी गणेश नाईक, मानसी मॅडम, कुडूस ग्रामपंचायत अधिकारी किरण हरड तसेच कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

