सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहात

सार्वजनिक शिवजयंती उत्सव उत्साहात

Published on

डहाणूत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल

कासा, ता. ८ (बातमीदार) : डहाणू शहरातील सागर नाका येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तिथीनुसार शुक्रवारी (ता. ६ मार्च) सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत ईसीजी, शुगर व डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले. या शिबिराचा डहाणू परिसरातील सुमारे २७० नागरिकांनी लाभ घेतला असून, त्यापैकी २२० जणांना मोफत चष्मे देण्यात आले. हे आरोग्य शिबिर पालघर येथील ढवळे हॉस्पिटल आणि एकता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने पार पडले.
कार्यक्रमाला डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र मच्छी, नगरसेवक वरून पारेख, नगरसेवक तन्मय बारी, प्रदीप चापेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मिलिंद मावळे, चंद्रकांत गोरखाना, रवींद्र फाटक, डॉ. विश्वास वळवी, तलासरीचे उपजिल्हाप्रमुख कुलात, अजगर शेख यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी डहाणूतील १५ ज्येष्ठ शिवसैनिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील आणि लिदोर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर व्याख्यान देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख तानाजी काकडे, तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख प्रदीप लिमये, विश्वास निकम तसेच महिला आघाडीच्या उज्ज्वला डामसे, सुचित्रा कोठारी आणि लावण्या शेट्टी यांनी विशेष सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com