वृत्तपत्र वितरणातील महिलांचा कुर्ल्यात सन्मान

वृत्तपत्र वितरणातील महिलांचा कुर्ल्यात सन्मान

Published on

वृत्तपत्र वितरणातील महिलांचा कुर्ल्यात सन्मान
कुर्ला वृत्तपत्र विक्रेता संघाचा महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
मुंबई, ता. ८ ः कुर्ला वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी (ता. ८) विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सद्डेकर आणि उपाध्यक्ष रवि संसारे यांची विशेष उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्या म्हणून दीपा समीर हिरडेकर उपस्थित होत्या.
याप्रसंगी वृत्तपत्र वितरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दररोज पहाटे लवकर उठून आपली घरगुती जबाबदारी सांभाळत वृत्तपत्र वितरणाचे कार्य निष्ठेने पार पाडणाऱ्या महिलांची उपस्थिती कार्यक्रमात उल्लेखनीय होती. त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
कार्यक्रमाची सुरुवात बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सद्डेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि पूजन करून करण्यात आली. या वेळी विविध वृत्तपत्रांच्या वितरण अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या दीपा हिरडेकर यांनी आपल्या मनोगतात शिक्षण क्षेत्रातील २६ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मार्गदर्शन केले. शिक्षणासंबंधी कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास आपण नेहमी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तसेच उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. यासोबतच उपस्थित सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष सुनील म्हापणकर, कार्याध्यक्ष अजय उतेकर, खजिनदार महेश शिरोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मधुसूदन सद्डेकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करीत उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com