उघड्या गटारामुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

उघड्या गटारामुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

Published on

उघड्या गटारामुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

धारावी, ता. ९ (बातमीदार) : धारावीतील संत कक्कया मार्गावरील दगडी इमारतीमागील शास्त्रीनगर येथील सोनेरी-चंदेरी मैदानालगत असलेल्या गटारातील गाळ काढण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू होते. सध्या गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. तरीही गटारावरील काँक्रीटचे झाकण पूर्ववत केले नसल्याने स्थानिकांना जीव धोक्यात घालून गटारावरून यावे-जावे लागत आहे. यामुळे रहिवासी व पादचारी संताप व्यक्त करत आहेत.
धारावीतील कवडे चाळ, बसवेश्वरनगर व शास्त्रीनगर विभागातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या अंतर्गत नाल्यात गाळ साचून राहिल्याने दररोज या विभागात गटारातील सांडपाणी सकाळच्या वेळेस साचून राहते, यामुळे स्थानिकांना या साचलेल्या सांडपाण्यातून आपली दैनंदिन कामे उरकावी लागतात. पावसाळ्यात तर पावसाचे पाणी व सांडपाणी सतत साचून राहते. वर्षानुवर्षे हा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. येथील स्थानिकांनी अनेकदा पालिकेकडे तक्रारी करून त्याचा पाठपुरावा केला होता. पालिकेच्या निवडणुका संपताच पालिका प्रशासनाने अनेक विभागात कामाचा जोर वाढवला आहे. त्याचाच फायदा या नालेसफाई कामाला झाला आहे. मात्र, नाल्यातील गाळ काढून गटार उघडेच ठेवल्याने लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, दिव्यांग व्यक्तींना जीव धोक्यात घालून उघड्या गटारावरून उड्या मारत मार्गक्रमण करावे लागत आहे. पालिकेने त्वरित धोकादायक झालेल्या गटारावर काँक्रीटचे झाकण टाकून ते बंद करावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com