कांदरवाडी आश्रमशाळेला आमदारांची भेट
कांदरवाडी आश्रमशाळेला आमदारांची भेट
आगीने झालेल्या नुकसानीची निकोले यांच्याकडून पाहणी
तारापूर, ता. ८ (बातमीदार) ः डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कांदरवाडी आश्रमशाळेतील वसतिगृहाचे गुरुवारी (ता. ५) सायंकाळी भीषण आगीत मोठे नुकसान झाले होते. या घटनेची दखल घेत डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांनी शनिवारी (ता. ७) प्रत्यक्ष पाहणी केली.
या वसतिगृहात २०० हून अधिक विद्यार्थी वास्तव्यास असल्याची माहिती आहे. आगीमुळे विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, गाद्या तसेच इतर आवश्यक वस्तू खाक झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त आहे. या घटनेनंतर आमदार विनोद निकोले यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. या वेळी शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी घटनेची माहिती घेतली. या घटनेत झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडे पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आवश्यक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

