एपीएमसीसीत पोलिसांचे मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’

एपीएमसीसीत पोलिसांचे मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’

Published on

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांनी एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (ता. ७) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. तसेच काही संशयित बांगलादेशी नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिमंडळ-१ मधील वाढती गुन्हेगारी व अमली पदार्थाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केल्यामुळे गुन्हेगारांचे तसेच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगार व बेकायदा कृत्य करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धडक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत झोन १, २, ३ आणि मुख्यालय मिळून सुमारे २० पोलिस अधिकारी आणि १५० पोलिस अंमलदारांच्या पथकाने सहभाग घेतला होता. यादरम्यान पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या किंग फिडलेस नावाच्या नायजेरियन नागरिकाला १० ग्रॅम कोकेनसह अटक केली. जप्त केलेल्या कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे अडीच लाख रुपये आहे. या कारवाईप्रमाणेच देशी बनावटीचे रिवॉल्व्हर आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या नजमुल शेख यालादेखील अटक करण्यात आली आहे.

कोपरी परिसरातून तीन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, प्राथमिक तपासात यापैकी दोन महिला बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या महिलेची चौकशी सुरू आल्याची माहिती एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com