शेतात घातक रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट
पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : तळोजा येथील धानसर गावच्या शिवारात उघड्या शेतात घातक घन आणि द्रव स्वरूपाचा रासायनिक कचरा टाकून पर्यावरण व लोकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
धानसर गावाबाहेरील एका मोकळ्या शेतात शुक्रवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास काही व्यक्तींनी अत्यंत घातक स्वरूपाची रसायने जमिनीत खड्डा खोदून उघड्यावर टाकली होती. हे रसायने जमिनीत मुरून भूगर्भातील पाणी दूषित होण्याची आणि जवळच असलेल्या नदीनाल्यांना मिळून मानवी आरोग्य व जीवसृष्टीला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याची तक्रार स्थानिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली. त्यानुसार मंडळाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ४१ ड्रम घन स्वरूपातील घातक रसायने, ३६ ड्रम द्रव स्वरूपातील रसायने, ३६ रिकामे ड्रम आणि सुमारे ४० ते ५० पांढऱ्या गोणींमध्ये भरलेला घनकचरा असा मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा हस्तगत केला आहे. त्यानंतर मंडळाचे क्षेत्र अधिकारी शिवानंद बसवदे यांनी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी घातक रसायनाचा साठा टाकणाऱ्या मोहम्मद अली असगर अली खान (५०) आणि अफसर रहिस अहमद खान (३९) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

