परिचारिकांचे निरंतर प्रशिक्षण उत्साहात

परिचारिकांचे निरंतर प्रशिक्षण उत्साहात

Published on

परिचारिकांचे निरंतर प्रशिक्षण उत्साहात
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन, अलिबाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे कार्यरत असलेल्या ३०० परिचारिकांसाठी नि:शुल्क निरंतर परिचर्या प्रशिक्षण शनिवारी (ता. २८) पार पडले.
प्रशिक्षणात अतिदक्षता विभागातील कौशल्यवृद्धी, परिचारिकांचे मानसिक स्वास्थ्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि करुणामय सेवाभावातून प्रभावी रुग्णसेवा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्‍घाटन अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. सुधाकर बेटेवार, सहाय्यक अधिसेविका नेहा गवंडे उपस्थित होत्या.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अर्चना बढे, इंदुमती थोरात, विशाल सोनार आणि योगिता थोरात यांनी मार्गदर्शन केले. तसेच वैशाली तळेकर, स्वरा मुंगेकर, वैभव कांबळे, अजित ठाणगे आणि सागर हंगरगे यांनीही व्याख्याने दिली. या प्रशिक्षणातून परिचारिकांना नोंदणी नूतनीकरणासाठी आवश्यक क्रेडिट तास मिळणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना बस्ते यांनी केले. आयोजनासाठी संघटनेच्या अध्यक्षा गर्जना गावकर व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com