किल्ले रायगड ते मुरुड शिवज्योत मशाल यात्रा
किल्ले रायगड ते मुरुड शिवज्योत मशाल यात्रा
मुरुड, ता. ८ (बातमीदार) : शिवजयंतीनिमित्त श्री शिवप्रेमी मित्र मंडळ, खारआंबोली यांच्या वतीने किल्ले रायगड ते मुरुड खारआंबोली दरम्यान शिवज्योत मशाल पायी यात्रा आयोजित करण्यात आली. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळील जगदीश्वर मंदिरात शिवशंकराची पूजा करून मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी बेडेकर यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री यात्रेला प्रारंभ झाला.
शुक्रवारी सकाळी मुरुड शहरात मशाल यात्रेचे आगमन होताच नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पद्मदुर्ग ढोल-ताशा व ध्वज पथकाच्या गजरात यात्रेला विशेष उत्साह लाभला. यानंतर बाजारपेठ ते मुरुड-जंजिरा नगर परिषद कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या उपक्रमात मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी सहभाग घेतला.
या निमित्ताने आरती, शिवकालीन दांडपट्टा कवायती, शालेय विद्यार्थ्यांची शिवचरित्रावरील भाषणे तसेच ‘शेर शिवराय’ चित्रपटाचे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

