नेरूळ रेल्वे स्थानकाने घेतला मोकळा श्वास
जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : नेरूळ रेल्वे स्थानक परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून स्थानक परिसरात सुरू असलेल्या जोरदार अतिक्रमण कारवाईमुळे गर्दुल्ले, तळीराम, तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि पदपथांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात अनेक दिवसांपासून अनधिकृत फेरीवाले, मद्यपी, तसेच काही गर्दुल्ले यांचा वावर वाढला होता. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात ये-जा करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत होती. यामुळे अपघाताचा धोकादेखील वाढला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गेल्या काही दिवसांपासून स्थानक परिसरात सातत्याने कारवाई सुरू केली आहे. प्रतिदिन मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी स्थानक परिसरात तैनात असतात. पदपथांवरील अनधिकृत स्टॉल, हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे हटविण्याचे काम नियमितपणे केले जात आहे.
नुकतीच महापालिकेच्या उपायुक्तांनी नेरूळ रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करत स्थानिक पोलिस प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या वेळी अतिक्रमणाविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्याचे संकेत देण्यात आले. तसेच स्थानक परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

