मालमत्ता कर वसुलीसाठी अधिकारी मैदानात
वाशी, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी गतीमान मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मालमत्ता कराच्या माध्यमातूनच नवी मुंबईकरांना दर्जेदार नागरी सेवा व सुविधा पुरविणे शक्य होते. त्यामुळे शहराच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर कर वेळेत भरणे आवश्यक असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत पालिकेकडे सुमारे ६६५ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला असून ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त वसुली व्हावी, यासाठी प्रशासनाने मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, मालमत्ता कर विभागाचे उपआयुक्त डॉ. अमोल पालवे, तसेच विविध विभागांचे सहआयुक्त व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत आयुक्तांनी आठही विभाग कार्यालयांमार्फत झालेल्या वसुलीचा आढावा घेत प्रत्येक विभागाला ३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करून दिले. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न थांबता प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे निर्देश दिले. मालमत्ता कर थकबाकीदारांची विभागनिहाय यादी तयार करून ती सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आली असून जास्त रकमेच्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

