पळसगाव वाडी येथे शिवजयंती उत्सव
पळसगाव वाडी येथे शिवजयंती उत्सव
माणगाव, ता. ८ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, पळसगाव वाडी यांच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव शुक्रवारी(ता. ८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात रायगड रोडवर शिवभक्तांसाठी चहा, पाणी व बिस्कीट वाटपाने झाली. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी या सेवेत सहभाग घेतला. गेली २३ वर्षे मंडळाच्या वतीने हा शिवजयंती उत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे. सकाळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
ग्रामस्थ व मंडळाच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडला. मंडळाचे संस्थापक उमेश गजानन पवार, सचिव प्रतिक पांडुरंग पवार, उपाध्यक्ष नागेश रघुनाथ चाळके तसेच ग्रामस्थांनी उत्सवाचे उत्तम नियोजन केले. यावेळी पळसगाव खुर्द येथील मिनाताई वरणकर तसेच पळसगाव बुद्रुक येथील पोलीस पाटील राकेश गजानन पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
फोटो ओळ : पळसगाव वाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

