महिलांच्या सशक्तीकरणासाठी कर्जतमध्ये ‘कन्याथॉन २०२६’

महिलांच्या सशक्तीकरणासाठी कर्जतमध्ये ‘कन्याथॉन २०२६’

Published on

महिलांच्या सशक्तीकरणासाठी कर्जतमध्ये ‘कन्याथॉन २०२६’
तीन हजार नागरिकांचा सहभाग
कर्जत, ता. ८ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील शिवतीर्थ, पोसरी येथे ‘रन फॉर हर – कन्याथॉन २०२६’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या उपक्रमात सुमारे तीन हजार विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्‍घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. यावेळी पीटीआय जम्मू-काश्मीरचे चीफ अनिल भट्ट आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू यादवेंद्र सिंग उपस्थित होते. महिलांच्या शिक्षण व सशक्तीकरणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या स्पर्धेत १० किमी, ५ किमी, ३ किमी धावस्पर्धा तसेच ३ किमी फन वॉक आयोजित करण्यात आले होते. विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमाच्या आयोजनासाठी विजयभूमी युनिव्हर्सिटीचे संस्थापक संजय पडोदे यांच्यासह अनेक संस्थांनी सहकार्य केले. कन्याथॉन उपक्रमाने महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com