रोहा नगरपालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई

रोहा नगरपालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई

Published on

रोहा नगरपालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई
रस्ते आणि फुटपाथ मोकळे; नागरिकांकडून मोहिमेचे स्वागत
रोहा, ता. ८ (बातमीदार) : रोहा शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अखेर नगरपालिकेने हातोडा उगारत धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सकाळपासून नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शहरातील विविध भागांत कारवाई करीत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली. या कारवाईमुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि फुटपाथ मोकळे झाल्याने शहरातील रस्त्यांनी जणू मोकळा श्वास घेतला आहे.
रोहा शहरात गेल्या काही वर्षांत अतिक्रमणांची समस्या गंभीर बनली होती. छोट्या व्यावसायिकांकडून रस्त्याकडेला किंवा उपलब्ध जागांवर तात्पुरती तसेच काही ठिकाणी पक्की शेड उभारून अतिक्रमणे करण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास वाढत होता. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्या आदेशानुसार नगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.
नगरपालिकेच्या पथकाने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. पथकाची कारवाई पाहताच काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली. नगरपालिकेच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, ही मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी सांगितले, की रोहा-कोलाड मुख्य रस्ता आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे पूर्णपणे हटवून झाल्यानंतर शहरातील इतर भागांमध्येही अशीच कारवाई करण्यात येईल.
चौकट
पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई
नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा दिला आहे. रस्ते व फुटपाथ पूर्णपणे मोकळे होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत अन्यथा नगरपालिकेकडून ती काढून टाकून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या इशाऱ्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

फोटो कॅप्शन : रोहा स्मशानभूमी रस्त्यालगत केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करताना नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com