मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावरील वृक्ष वाचवण्यासाठी हरित लवादाकडे धाव

मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावरील वृक्ष वाचवण्यासाठी हरित लवादाकडे धाव

Published on

मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावरील वृक्ष वाचवण्यासाठी हरित लवादाकडे धाव

मुलुंड, ता. ८ (बातमीदार) : मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगत प्रस्तावित उन्नत रस्त्याच्या प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महापालिकेने लवादाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुलुंड ते छेडानगरदरम्यान एकूण ३८६ झाडे पुन्हा लावली जाणार असून, ३२० झाडे तोडली जाणार असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, नव्या वृक्षलागवड आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागेचा सविस्तर आराखडा अद्याप एमएमआरडीएकडून मिळालेला नसल्याची कबुलीही पालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ठाणे ते घाटकोपरदरम्यान १२.९५ किलोमीटर लांबीचा उन्नत रस्ता उभारण्याची योजना आखण्यात आली असून, हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्गाच्या समांतर धावणार आहे. छेडानगर ते मुलुंडमधील आनंदनगरदरम्यानचा हा कॉरिडॉर उपनगरीय प्रवाशांचा प्रवास वेळ कमी करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित करण्यात आला आहे.
-------
या मार्गालगत अनेक ताबेबुया वृक्ष असून, त्यापैकी काही झाडे जपली जाणार आहेत, तर काही झाडे प्रकल्पामुळे प्रभावित होणार आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात फुलांनी बहरणारी ही झाडे शहरातील ‘चेरी ब्लॉसम’ म्हणून ओळखली जातात. वृक्षतोडीविरोधात नागरिकांनी अनेक आक्षेप नोंदवले असून, प्रत्यारोपणाची व्यवहार्यता याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
---------
मुलुंडचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी वृक्षतोडीविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणीदरम्यान लवादाने पालिकेला सविस्तर वृक्षारोपण योजना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com