कडाव ग्रामपंचायतीत शिंदे सेनेला धक्का
कडाव ग्रामपंचायतीत शिंदे सेनेला धक्का
टाकवे गावातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश
कर्जत, ता. ८ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत परिसरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून टाकवे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी (ता.७) हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.
या पक्षप्रवेशात शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच योगेश बांदल, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण खैरे यांच्यासह गोरख दळवी, रतन थोरवे, कैलास दळवी, संतोष बदे, संदीप भोईर, अमोल बांदल, वाळकु गोपाळे, सनी गोसावी, रघुनाथ गोसावी, वैभव थोरवे, विजय खैरे, समाधान भोईर, काळुराम भोईर, गणेश बांदल, देविदास खैरे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते मधुकर घारे, ज्येष्ठ नेते बंधू पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक भोपतराव, तालुकाप्रमुख दीपक श्रीखंडे, विलास थोरवे, नगरसेवक राजाभाऊ कोठारी, युवक तालुकाध्यक्ष स्वप्नील पालकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
टाकवे गावातील या पक्षप्रवेशामुळे कडाव ग्रामपंचायत परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

