पनवेल महापालिका महासभेमध्ये समित्यांवरील सदस्यांची निवड

पनवेल महापालिका महासभेमध्ये समित्यांवरील सदस्यांची निवड

Published on

पनवेल, ता. ८ (बातमीदार) : महापालिकेच्या महासभेत सात स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा करण्यात आली तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. गटनेत्यांनी दिलेल्या शिफारशींनुसार महापौरांनी सभागृहात सदस्यांची नावे घोषित केली. या वेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले.

महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (ता. ६) महासभा पार पडली. या वेळी उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, नगरसचिव नानासाहेब कामठे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. सत्ताधारी गटाने प्रवीण पाटील, मधु पाटील, समीर कदम, बबन मुकादम, रवींद्र भगत, विजय खानावकर, हेमलता गोवारी, रवींद्र जोशी, राजेश्री वावेकर, मनोज भुजबळ, रुचिता लोंढे आणि अजय बहिरा, तर विरोधी गटाच्या वतीने अरविंद म्हात्रे, हरेश केणी आणि तुषार पाटील यांना स्थायी समितीत पाठवण्यात आले. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रिया गोवारी यांना प्रतिनिधित्व मिळाले.

महिलांना संधी
महिला व बालकल्याण समितीवर लीना म्हात्रे, अनिता पाटील, सोनल नवघरे, बायजा बारगजे, प्रतीक्षा भोईर, सरस्वती काथारा, शीला भगत, कुसुम पाटील, ममता म्हात्रे, अस्मिता घरत, रुचिता लोंढे आणि कांडपिळे यांची निवड करण्यात आली. तर विरोधी आघाडीच्या वतीने योगिता फडके, मनीषा म्हात्रे, अर्चना भोईर आणि मेघना घाडगे यांना या समितीवर स्थान देण्यात आले.

स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा
महासभेत स्वीकृत नगरसेवक म्हणून परेश ठाकूर, डॉ. अरुण भगत, गणेश कडू, ॲड. प्रथमेश सोमण, प्रकाश म्हात्रे आणि नितीन गावंड यांच्या नावांची घोषणा महापौरांनी केली. त्यांच्या निवडीचे सभागृहात स्वागत करण्यात आले.

सभागृह व विरोधी पक्षनेते निवड रखडली
पालिकेचे सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते पदाची घोषणा महासभेमध्ये करण्यात आली नाही. त्यामुळे अरविंद म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली. जाणूनबुजून आणि हेतुपूर्वक ही निवड लांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विषय पत्रिकेवर निवडीचा विषय नसल्यामुळे आपण उच्च न्यायालयात रीट दाखल केल्याची म्हात्रे यांनी सांगितले. त्याचबरोबर विविध प्रश्नांवर लक्षवेधी दिलेली असतानाही त्याच्यावरती महापौरांनी चर्चा केली नसल्याची खंत हरेश केणी यांनी व्यक्त केली.

मालमत्ता कराच्या मुद्द्यावर आवाज कायम
सर्वसाधारण सभेनंतर मीना गरड यांनी सिडको वसाहतीतील मालमत्ताधारकांवर लावण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ता कराविरोधात भूमिका मांडली. सुमारे अडीच लाख मालमत्ताधारकांना सवलत देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला. पुढील महासभेत हा मुद्दा अजेंड्यावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com