पारिजात कथा अभिवाचन स्पर्धेत विद्याभवन शाळेचे  यश

पारिजात कथा अभिवाचन स्पर्धेत विद्याभवन शाळेचे यश

Published on

पारिजात कथा अभिवाचन स्पर्धेत विद्याभवन शाळेचे यश
नेरूळ, ता. ८ (बातमीदार) : मराठी भाषा दिनानिमित्त पारिजात संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘ गोष्ट मराठीची’ कथा अभिवाचन स्पर्धा दादर येथील कीर्ती कॉलेजमध्ये उत्साहात पार पडली. मुंबई, वसई, विरार आणि नवी मुंबई परिसरातील १७ शाळांमधील ११३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन शैक्षणिक संकुल, नेरूळ शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्राथमिक मराठी व माध्यमिक इंग्रजी या दोन्ही विभागांत द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना पारितोषिक, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि २ हजार रुपयांची रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
प्राथमिक मराठी विभागातील मोठ्या गटात वेदिका कणसे व साक्षी ढिलपे यांनी यश मिळवले, तर लहान गटातून अनिक पिसे याला विशेष पारितोषिक मिळाले. माध्यमिक इंग्रजी विभागात गार्गी कांबळे, स्वरा माळी, कृपा शितकर, ईशान चव्हाण आणि आरिझ पटवेगार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
संस्थेचे कुलसचिव दिनेश मिसाळ, मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com