परिवहन सभापतींना कॅबिन नसल्याने संजीव नाईक संतप्त

परिवहन सभापतींना कॅबिन नसल्याने संजीव नाईक संतप्त

Published on

परिवहन सभापतींना कॅबिन नसल्याने संजीव नाईक संतप्त
वाशी, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदी विकास झंझाड यांची बिनविरोध निवड झाली असली तरी त्यांच्यासाठी पालिका मुख्यालयात स्वतंत्र कॅबिनची व्यवस्था नसल्याने वाद निर्माण झाला आहे. सभापती बसणार कुठे, असा सवाल उपस्थित करत भाजपचे नवी मुंबई निरीक्षक व माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
महत्त्वाच्या पदावर असलेल्या परिवहन सभापतींसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे नाईक यांनी सांगितले. “परिवहन सभापतींना बसायला जागा नसेल तर त्यांना आयुक्तांच्या खुर्चीवर बसवावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.
या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर पालिका मुख्यालयातील पाचव्या मजल्यावर परिवहन सभापतींसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आले. या घटनेमुळे पालिकेतील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com