नेरूळ–उरण फाटा रस्त्यावरील खड्डे त्रासदायक

नेरूळ–उरण फाटा रस्त्यावरील खड्डे त्रासदायक

Published on

नेरूळ–उरण फाटा रस्त्यावरील खड्डे त्रासदायक
बेलापूर, ता.८ (बातमीदार) : स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सायन–पनवेल महामार्गासह शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवरही खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नेरूळ एलपी ते उरण फाटा या मार्गावरील उड्डाणपुलावर मोठे खड्डे व रस्त्याला भेगा पडल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. या खड्ड्यांमधून वाहने जाताना दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या तसेच अपघाताच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मान्सूनपूर्व काळात येथे खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र ते काम तात्पुरते व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप रस्ते व वाहतूक सुरक्षा संघटनांनी केला आहे. सध्या पुन्हा खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com