ठाण्यात कष्टकरी महिलांचा सन्मान
ठाण्यात कष्टकरी महिलांचा सन्मान
धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा महिला दिन उत्साहात
ठाणे, ता. ८ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यात धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने कष्टकरी महिलांचा सन्मान करून महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजातील मेहनती महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
जागतिक महिला दिनानिमित्ताने घरकाम, कष्टमजुरी आणि विविध कामांद्वारे कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने विशेष सत्कार केला. महिलांच्या योगदानाची दखल घेत सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील मासुंदा तलावाजवळ असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत महिलांसाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणेची आठवण करून दिली.
या कार्यक्रमाला धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर, सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे यांच्यासह सदस्य संगीता खटावकर, सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, स्मिता गावडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान महिलांनी एकत्र येत जागतिक महिला दिन साजरा केला तसेच महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

