पद्मश्री कलाकाराची दयनीय अवस्था

पद्मश्री कलाकाराची दयनीय अवस्था

Published on

पद्मश्री कलाकाराची दयनीय अवस्था
ज्येष्ठ तारपावादक भिकल्या धिंडा आर्थिक संकटात

जव्हार, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यातील वाळवंडा गावचे वारली समाजातील ज्येष्ठ तारपावादक, पद्मश्री भिकल्या धिंडा सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळूनही त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.

पारंपरिक तारपावादन या आदिवासी लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या भिकल्या धिंडा यांना नुकतेच केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले; मात्र इतक्या मोठ्या राष्ट्रीय सन्मानानंतरही त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून दैनंदिन खर्च आणि उपचारांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करत आमदार सत्यजित तांबे यांनी या ज्येष्ठ कलाकाराच्या अवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधले. आदिवासी संस्कृतीचा अमूल्य वारसा जपणाऱ्या कलाकाराला सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत, निवास व्यवस्था तसेच लोककला संवर्धनासाठी विशेष योजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर, पालघर जिल्ह्यातील स्थानिक राजकारण्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील जनप्रतिनिधींनी पुढाकार घेत या ज्येष्ठ कलाकाराला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून होत आहे. राष्ट्रीय सन्मान मिळालेल्या कलाकाराची अशी दयनीय अवस्था ही खेदजनक बाब असून शासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com