नेरूळमधील औषधांच्या दुकानाला भीषण आग

नेरूळमधील औषधांच्या दुकानाला भीषण आग

Published on

जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर २० येथील तलाव रस्त्यावर असलेल्या दिशा अपार्टमेंट परिसरातील ग्रीन ॲपल फार्मसी या औषधांच्या दुकानाला शुक्रवारी (ता. ६) मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण दुकान खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून पोलिस प्रशासन व अग्निशमन दलाला तत्काळ कळविण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र या आगीत दुकानामधील सर्व औषधे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर तसेच इतर साहित्य पूर्णपणे खाक झाले आहे. त्यामुळे दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच शेजारील एका दुकानाचा नावाचा फलकदेखील या आगीत खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com