मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपील ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपील ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

Published on

मुंब्रा गोळीबारप्रकरणी आरोपील ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : मुंब्र्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घराबाहेर आणि त्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शहाबाद ऊर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी (वय २८) हा दिल्लीतील एका टोळीशी संलग्न असल्याचे समोर आले आहे. त्यातच त्याची आणि बांधकाम व्यावसायिक यांची नजरानजरेहून बाचाबाची झाली होती. तसेच बांधकाम व्यावसायिक हे यूट्युबर असल्याने ते त्या माध्यमातून थेट आव्हान देत असल्याने ते जीवे मारतील, या भीतीतून कुरेशी याने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. हा गोळीबार सुपारी दिल्याने झाला नसल्याचा दावाही मुंब्रा पोलिसांनी केला असून, आरोपी कुरेशीला ११ मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
शहाबाद ऊर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी हा मूळचा दिल्ली येथील रहिवासी आहे. तसेच तो दिल्लीतील एका टोळीशी संलग्न असून, त्याच्यावर दिल्लीत विविध गुन्हे दाखल आहेत. त्यातच तो आठ वर्षे तिहार जेलमध्ये होता. काही महिन्यांपूर्वी तो तिहार जेलमधून बाहेर आला असून, तो दोन महिन्यांपूर्वी मुंब्रा शिळफाटा परिसरात एका नातेवाइकांकडे राहण्यासाठी आला होता. याचदरम्यान तो आणि बांधकाम व्यावसायिक हे दोघे आमनेसामने आले. त्या दोघांमध्ये नजरानजर झाल्याने त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. तसेच बांधकाम व्यावसायिक हा यूट्युबर असल्याने तो त्या माध्यमातून आव्हाने देत असल्याचे कुरेशीला समजले. त्यातून त्याने जीवे मारण्याच्या भित्तीतूनच हा गोळीबार केल्याचे तपासात समोर आल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com