खोल समुद्रात ‘सी प्रिन्सेस’ मासेमारी नौकेला आग;

खोल समुद्रात ‘सी प्रिन्सेस’ मासेमारी नौकेला आग;

Published on

‘सी प्रिन्सेस’ मासेमारी नौकेला आग
एक खलाशी जखमी; सुमारे ४० लाखांचे नुकसान
मालाड, ता. ८ (बातमीदार) ः भाटी कोळीवाडा येथील भाटी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेडच्या महिला सभासद रेश्मा मोझेस धाके यांच्या ‘सी प्रिन्सेस’ या मासेमारी नौकेला खोल समुद्रात मासेमारी करीत असताना अचानक आग लागल्याची दुर्घटना घडली. स्टोव्ह अथवा गॅसचा भडका उडाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ मुंबई कोस्ट गार्ड, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (मुंबई उपनगर) आणि येलो गेट पोलिस ठाणे यांना कळवले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाने जलद मदतीसाठी नौसेना अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच मढ दर्यादीप मच्छीमार सहकारी संस्थेचे सचिव स्वप्नील कोळी यांनी वायरलेसद्वारे कोस्ट गार्ड आणि नौसेनेशी संपर्क साधला. नौसेनेचे जहाज वेळेत घटनास्थळी पोहोचले; मात्र त्यांनी केवळ पाहणी करून ते तेथून निघून गेल्याची माहिती संस्थेचे सचिव शैलेश कोळी यांनी दिली. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने मदत पोहोचेपर्यंत आगी नौकेच्या नाळीपर्यंत (समोरील भागापर्यंत) मोठ्या प्रमाणात पोहोचली होती.
या दुर्घटनेत नौकेवरील एका खलाशाच्या दोन्ही पायांना आणि एका हाताला गंभीर दुखापत झाली. त्याला सागरकन्या या नौकेच्या मदतीने किनाऱ्यावर आणून कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित खलाशांना जवळील दुसऱ्या नौकेने सुरक्षितपणे बाहेर काढले असून, ते सर्व सुखरूप असल्याची माहिती भाटी कोळीवाडा ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कोळी यांनी दिली.
या आगीत नौकामालक रेश्मा मोझेस धाके यांचे अंदाजे ४० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com