माणगावमध्ये आगीचे तांडव
माणगावमध्ये आगीचे तांडव
अर्धा तास उशिराने अग्निशामक गाडी; नागरिकांनीच घेतला पुढाकार
माणगाव, ता. ८ (वार्ताहर) : रंगपंचमीच्या दिवशी माणगाव नगरपंचायतीजवळील जुन्या पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या मागील भागात भर दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र आग लागल्यानंतर सुमारे अर्धा तास अग्निशामक दलाची गाडी न आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तहसील कार्यालयासमोरील साई मंदिराजवळ ही आग लागली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आग लागल्यानंतर बराच वेळ प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेजारील घरातील एका महिलेने पाण्याचा पाईप घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
यानंतर सुमारे अर्ध्या तासाने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र गाडीत केवळ चालकच उपस्थित असल्याने नागरिकांनीच वॉटर फ्लो पाईप हातात घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले. शेवटी आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाटबंधारे विभागाच्या बंद पडलेल्या जुन्या गाड्या जळून खाक झाल्या. या घटनेमुळे माणगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

