सर्वसामान्यांसाठी झटणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व

सर्वसामान्यांसाठी झटणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व

Published on

सर्वसामान्यांसाठी झटणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
वसई-विरार शहरांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेणारे महापौर अजीव पाटील
( शब्दांकन - प्रसाद जोशी )
संयमी, शांत, प्रिय आणि मनमिळाऊ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून वसई-विरार महापालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्याकडे पाहिले जाते. विरोधकांना आपल्या स्वभावाने आपलेसे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, युवानेते क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकासाची गंगा वाहणार आहे.
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अजीव पाटील यांची निवड महापौर म्हणून झाल्यानंतर साहित्य क्षेत्रात आनंदाचा झरा वाहिला. ज्येष्ठ कवी अशोक बागवे, ‘डिंपल’चे अशोक मुळे, कवयित्री सुरेख कुरकुरे, संगीतकार व लेखक प्रकाश पाटील यांच्यासह कवी, लेखक, साहित्यिकांनी हितेंद्र ठाकूर यांच्या निर्णयाचे स्वागत केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे विरार शाखा अध्यक्ष असलेले अजीव पाटील साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य आहेत. तसेच यंग स्टार्स ट्रस्टचे समन्वयक आहेत. लेखक, साहित्यिक, कवी, नवोदित लिखाण करणाऱ्यांसाठी त्यांनी व्यासपीठ तयार केले. व्हिवा साहित्य चावडी कट्ट्याचे ते समन्वयक वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या विश्वस्त पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. यंग स्टार्स ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी तसेच कला-क्रीडेस प्रोत्साहन देणारे उपक्रम त्यांनी हाती घेतले. ऐतिहासिक पाऊलखुणा, आध्यात्मिक उपक्रम, सणासुदीला विविध उपक्रमांतून जनजागृती मोहीम राबवली. त्याची पोचपावती म्हणून यंग स्टार्स ट्रस्टची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झाली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार यांच्यासोबत सावलीसारखे राहिले आहेत. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी नेहमी चर्चा करून नवे निर्णय घेण्याचा त्यांचा विचार असतो. नुकतेच स्थायी समिती सभापती म्हणून प्रवीण शेट्टी यांची निवड झाली. त्या वेळी पालिकेच्या माध्यमातून जनहिताच्या कामांसाठी चर्चा करण्यात आली. वसई-विरार शहर महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती पदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्याच कामाच्या जोरावर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी थेट महापौर पदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. पदभार सांभाळला तेव्हापासून विकासकामांची आढावा बैठक, निर्णय, सर्वसामान्य नागरिकांना भेटीगाठींचे सत्र आजतागायत सुरू आहे. विशेष म्हणजे महापौर दालनात सर्वसामान्य नागरिकांना गाऱ्हाणे, समस्या, उपाययोजनांसाठी थेट प्रवेश भेटत असल्याने ‘हक्काचा माणूस’ अशी ओळख अल्पावधीतच निर्माण झाली आहे.
------------------
अजीव पाटील महापौर होण्याअगोदरपासूनच त्यांची नाळ सर्वसामान्य नागरिकांसोबत घट्ट राहिली आहे. महापालिकेत विविध पदे भूषवताना बहुजन विकास आघाडीच्या वाढीसाठी नेहमीच त्यांचे प्रयत्न राहिले. कधी कुणालाही दुखावले नाही. त्यांचा प्रेमळ स्वभाव असल्याने विरोधकदेखील त्यांचे होतात. नागरिकांची कामे झालीच पाहिजेत, हा त्यांचा अट्टहास वाखाणण्यासारखा असून, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- जितूभाई शहा, माजी सभापती, स्थायी समिती
-------------
प्रभागातील प्रत्येक कामाचा पाठपुरावा असो की कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन, अजीव पाटील नेहमी अग्रेसर असतात. सातत्याने पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते जनसामान्यांत लोकप्रिय आहेत. विकासकामांना गती आणि शहराचा सुनियोजित कायापालट करण्यासाठी महापौर अजीव पाटील लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामुळे भविष्यात शहर एका वेगळ्या उंचीवर असेल, यात काही शंका नाही.
- प्रशांत राऊत, नगरसेवक
------------
वसई-विरार महापालिकेच्या माध्यमातून महापौर अजीव पाटील यांनी अनेक योजना आखण्यास सुरुवात केली आहे. बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन, क्रिकेट, कॅरमसारख्या विविध खेळांच्या सुविधांसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मैदाने विकसित करून वसई-विरार शहरातील खेळाडूंना सराव, स्पर्धेसाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना नक्कीच फायदा होईल.
- पंकज ठाकूर, कॅरम असोसिएशन - पालघर जिल्हा अध्यक्ष, बॅडमिंटन असोसिएशन - महाराष्ट्र उपाध्यक्ष
-----------
शुभेच्छुक - बहुजन विकास आघाडी
-------------
( शब्दांकन - प्रसाद जोशी)
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com