संविधानाची भाषा, पण आचरण नाही!

संविधानाची भाषा, पण आचरण नाही!

Published on

संविधानाची भाषा, पण आचरण नाही!
राष्ट्रपतींच्या अपमानावर विरोधक शांत : चित्रा वाघ


ठाणे, ता. ८ : ‘संविधानावर बोलणारे त्याचे आचरण मात्र करीत नाहीत. राष्ट्रपतींच्या अपमानावर ते शांत आहेत,’ असा टोला भाजप महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष, आमदार चित्रा वाघ यांनी विरोधकांना लगावला. ‘पश्चिम बंगालमधील प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. राष्ट्रपती संथाल येथे आल्या असताना तिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थितीत नव्हत्या. हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नाही तर त्यांच्या पदाचा अपमान आहे,’ असेही वाघ म्हणाल्या.

ठाणे भाजप महिला मोर्चातर्फे रविवारी (ता. ८) महिला दिनानिमित्त ‘महिला सुरक्षा आणि महिला कायदे’ याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चित्रा वाघ उपस्थितीत होत्या. या वेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, महिला अध्यक्ष स्वप्नाली साळवी, नगरसेविका मृणाल पेंडसे आदी उपस्थितीत होते. या वेळी चित्रा वाघ म्हणाल्या, की येत्या काळात भाजपच्या पक्षीय ताकदीत वाढ होईल. आपण खूप भाग्यवान आहोत, परदेशात महिलांना मतासाठी झगडावे लागले. पण आपल्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तो हक्क मिळाला. त्यांच्यानंतर महिलांना कोणी न्याय दिला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आज विधानसभा आणि विधान परिषदेत इतर पक्षांपेक्षा भाजपमध्ये महिला आमदारांची संख्या अधिक आहे. सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात महिलांना नोकरी जाण्याचा धोका कमी असतो. पण खासगी क्षेत्रात हा धोका अधिक असतो. खासगी क्षेत्रात ९० टक्के महिला काम करतात, यासाठी लवकरच ‘पॉश ॲक्ट’ची अंमलबजावणी होणार आहे.


मुख्यमंत्र्यांकडून महिलांचा सन्मान
‘ज्यांनी १५ रुपये दिले नाहीत ते १,५०० रुपयांवर टीका करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना १,५०० रुपये देऊन त्यांचा सन्मान केला. आमचे भाऊ वर्षातून दोन वेळा भेट देतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर महिन्याला लाडक्या बहिणींना भेट देतात, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com