खारघरमध्ये मैदानातील गवताला आग
खारघरमध्ये मैदानातील गवताला आग
खारघर, ता. ८ (बातमीदार) : खारघर सेक्टर ३५ पॅराडाईज सोसायटी आणि तळोजा सेक्टर १६ आस्था पॅलेस सोसायटीलगत असलेल्या मोकळ्या मैदानातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याची दुर्घटना रविवारी घडली. खारघर अग्निशमन जवानांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
खारघर सेक्टर ३५ पॅराडाईज सोसायटीलगत असलेल्या मैदानातील गवताला रविवारी दुपारी एकच्या सुमारास, तर तळोजा फेज -२ आस्था पॅलेस सोसायटीलगत मैदानात साचलेल्या कोरड्या गवताला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे मोकळ्या मैदानात साचलेले कोरडे गवत आणि कचरा यामुळे अशा दुर्घटना घडण्याची शक्यता वाढत असल्याने संबंधित प्रशासनाने वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

