कराओके गायन स्पर्धा

कराओके गायन स्पर्धा

Published on

डोंबिवलीत रंगली कराओके गायन स्पर्धा
डोंबिवली, ता. ९ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘माऊली एक शैक्षणिक ध्यास’ आणि ‘कलारंजन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली कराओके गायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. एकता मित्र मंडळाच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेला विविध जिल्ह्यांतून ४० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ‘अखंड वाचनयज्ञ’चे संकल्पनाकार डॉ. योगेश जोशी आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या वेळी बोलताना डॉ. जोशी म्हणाले, ‘‘गायन, वादन, लेखन आणि वाचन यांसारखे छंद जोपासल्यामुळे दैनंदिन जीवनात ऊर्जा मिळते आणि कार्यक्षमता वाढते.’’

प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी १३ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. अटीतटीच्या अंतिम फेरीत प्रथम क्रमांक जानवी जितेंद्र करंबेळकर यांनी पटकवला, तर प्रसाद उलांडे आणि गणेश शर्मा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना माऊली संस्थेचे अध्यक्ष शंकर राऊळ, कार्याध्यक्ष हेमंत नेहेते, कलारंजनचे अध्यक्ष विनायक नवरे आणि दिपाली नवरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

विजेत्यांना पुस्तक भेट
स्पर्धेतील सर्व ४० सहभागींना टी-शर्ट, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ‘अक्षरमंच प्रकाशन’तर्फे ‘वंद्य वंदे मातरम्’ हे पुस्तक भेट देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण स्नेहा कुलकर्णी-दांडेकर, ऋषिकेश पाटील आणि गौरव दांडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशुतोष कानिटकर, संतोष पुजारी, अभिजित तेलंग, दीपाली नवरे, रेशमी कानिटकर, राहुल जाधव, मनोहर राऊळ व ज्योती टेक्नॉलॉजी डिझाइन यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com