अक्सा चौपाटीवर महिलांचा जल्लोष
अक्सा चौपाटीवर महिलांचा जल्लोष
‘जननी फाउंडेशन’तर्फे कसरती, खेळ आणि पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम
मालाड, ता. ९ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मालाड येथील अक्सा चौपाटीवर ‘जननी फाउंडेशन’च्या वतीने विविध कसरती, गमतीशीर खेळ आणि बीच वर्कआऊटचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात चारकोप, मालाड, विरार आणि कांदिवली परिसरातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेत आनंद लुटला.
महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी चौपाटी कसरत (बीच वर्कआऊट), मनोरंजक खेळ तसेच विविध शारीरिक व मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सहभागी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
‘जननी’ म्हणजे आई, माता किंवा जन्मदात्री. जी जीवाला जन्म देते, त्याचे संगोपन करते आणि त्याची काळजी घेते त्या स्त्रीला ‘जननी’ म्हणतात. या संकल्पनेला साजेसा सामाजिक संदेश देत जननी फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. कचरा योग्य ठिकाणी टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि शून्य कचरा निर्मितीकडे वाटचाल करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
या कार्यक्रमातून महिलांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद, उत्साह आणि हसू पाहून त्यांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचा प्रतिसाद सहभागी महिलांनी दिला. दैनंदिन जीवनातील धकाधकीतून आणि मानसिक तणावातून काही क्षण मोकळे होऊन आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

