औद्योगिक क्षेत्रात कचऱ्याचे ढीग
औद्योगिक क्षेत्रात कचऱ्याचे ढीग
बोईसर, तारापूर परिसरातील नागरिक हैराण
बोईसर, ता.९ (वार्ताहर): राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकला जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात शेकडो लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत आहेत.दररोज मोठ्या प्रमाणात औद्योगिक तसेच सर्वसाधारण घनकचरा निर्माण होत असतो. पण नियमित व नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामासाठी येणारे हजारो कामगार, स्थानिक रहिवासी तसेच विद्यार्थ्यांना विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------------------
कचऱ्याची नियमित व नियोजनबद्ध विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्यामुळे विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था करावी.
ृः- नीलम संखे, उपसरपंच, बोईसर ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

