चारोटी-डोंगरपाडा प्रवासात मनस्ताप

चारोटी-डोंगरपाडा प्रवासात मनस्ताप

Published on

चारोटी-डोंगरपाडा प्रवासात मनस्ताप
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ, विद्यार्थी हैराण
कासा, ता. ९ (बातमीदार) ः चारोटी ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी जाणारा चारोटी-डोंगरपाडा रस्ता खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक झाले आहे.
डहाणूजवळील मुख्य रस्त्यापासून डोंगरपाड्याकडे जाणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. रस्त्यावरील खडी निघून गेल्यामुळे काही भागात रस्ताच राहिलेला नाही. पावसाळ्यानंतर रस्त्याची दुरवस्था वाढली असून, वाहनचालकांसह पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचा वापर डोंगरपाडा परिसरातील नागरिकांना चारोटी, डहाणूकडे ये-जा करण्यासाठी करावा लागतो. शालेय विद्यार्थी, कामानिमित्त जाणारे नागरिक तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेलादेखील जाणे अवघड होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात चारोटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रणय मेहर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
----------------------------
अनेक वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष रस्त्याची दुरुस्ती करावी.
- नीलेश घाटाळ, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com