डिजिटल अटक दाखवून ठाण्यातील वयोवृध्दाला १५.५० लाखांचा गंडा

डिजिटल अटक दाखवून ठाण्यातील वयोवृध्दाला १५.५० लाखांचा गंडा

Published on

डिजिटल अटकेच्या नावाखाली वयोवृद्धाला १५.५० लाखांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : दिल्ली क्राइम ब्रांच आणि नाशिक पोलिस अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अटक केल्याचा बनाव करत ठाण्यातील कोलशेत येथील एका ६६ वर्षीय वयोवृद्धाला तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार हे घरी असताना ७ जानेवारी रोजी त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःचे नाव अजित कुमार सिंग सांगत आपण दिल्ली क्राइम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईल नंबरवरून एका नग्न व्हिडिओ प्रकरणात संपर्क आढळल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करत स्वतःला डेटा प्रोटेक्शन ब्रँच कोलाबा व नाशिक पोलिसांचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. तक्रार क्रमांक देत त्यांच्या आधार कार्डचा वापर करून युनियन बँकेत खाते उघडून दहशतवादी व्यवहारासाठी दोन कोटी रुपयांचे मनी लॉन्डरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला. तपासासाठी सहकार्य न केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखवून भामट्यांनी तक्रारदाराकडून वैयक्तिक माहिती, बँक खात्यांचे तपशील आणि संपत्तीची माहिती घेतली. तसेच व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत असल्याचे सांगून त्यांना घराबाहेर न जाण्याच्याही सूचना दिली. यानंतर आरबीआयच्या नियमांनुसार पडताळणीसाठी शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढून दिलेल्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. याचदरम्यान भामट्यांनी बनावट आरबीआय पत्रही पाठवले. त्यामुळे तक्रारदाराने शेअर मार्केटमधील गुंतवणूक मोडून भामट्यांनी दिलेल्या खात्यात १५ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले. काही दिवसांनी त्या भामट्यांनी आणखी पैसे मागितल्याने तक्रारदारांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तक्रारदार यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंदवली. यानुसार भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com