बेकायदा हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंटवर छापा

बेकायदा हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंटवर छापा

Published on

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : वाशी येथील ग्रीनस्केप इमारतीमधील एका रेस्टॉरंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर वाशी पोलिसांनी रविवारी (ता. ८) रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून हुक्क्याचे साहित्य आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला आहे.

वाशी येथील सेक्टर ३०, ग्रीनस्केप बिल्डिंगमधील ‘हाउस ऑफ लॉर्ड’ या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बेकायदा हुक्का पुरविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाशी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या वेळी काही ग्राहक निकोटीनयुक्त आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे दोन हजारांचे सुगंधी फ्लेवर्स, हुक्का पॉट आणि नळ्या असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाशी पोलिसांनी निजामुद्दीन आरिफ (रा. अंधेरी), विमल अखिलेश पांडे (रा. पनवेल) व धर्मेंद्रकुमार सत्तेलाल सिंग (रा. वाशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. ही कारवाई वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव रुपवते व त्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com