ठाणे भारत सहकारी बँकेला इंटरनेट बँकिंगच्या
ठाणे भारत सहकारी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
इंटरनेट बँकिंग श्रेणीत उमटवला ठसा
ठाणे, ता. ९ ः ठाणे भारत सहकारी बँकेला इंटरनेट बँकिंगच्या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३० व ३१ जानेवारी रोजी खोपोली येथे झालेल्या सहकारी सीएक्सओ १०० शिखर परिषदेत बँकेला आयकॉनिक लीडर पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
प्रतिष्ठित सहकारी परिषदेत वित्त, तंत्रज्ञान आणि सहकारी क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील विशेषतः सहकारी क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. अशा नाविन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ठाणे भारत सहकारी बॅंक लिमिटेडला अनेक वर्षांपासून ग्राहकांना सेवा देत आहेत आणि ग्राहकांकडून त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. लवकरच कासारवडवली येथे बँकेची ३१ वी शाखा सुरु होणार आहे. आजमितीस बँकेच्या ३० शाखा कार्यरत असून, एकूण दोन हजार २८५ कोटी इतका व्यवसाय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

