ठाण्यात "ध ध्यानाचा" ध्यानधारणेच्या तीन दिवसीय सत्राची उत्स्फूर्त सुरुवात
ठाण्यात ‘ध ध्यानाचा’
ध्यानधारणेच्या तीन दिवसीय सत्र उत्साहात
ठाणे, ता. ९ (बातमीदार) : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शारीरिक आरोग्यासाठी समतोल आहार आणि व्यायामावर भर दिला जातो; मात्र मानसिक स्वास्थ्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हेच लक्षात घेऊन ‘ग गप्पांचा, व वाचनाचा, भ्र भ्रमंतीचा, च चालण्याचा’ या उपक्रमाचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांच्या पुढाकाराने ‘ध ध्यानाचा’ म्हणून ध्यानधारणेचे तीन दिवसीय विशेष सत्र ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या सत्राची सुरुवात ५ मार्चला झाली तर त्याची सांगता रविवारी (ता. ८) झाली.
या कार्यक्रमात ‘सहज मार्ग’ संस्थेचे स्वयंसेवक नंदकिशोर वैद्य यांनी ध्यानधारणा का करावी आणि ती कशी करावी, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वैद्य आणि बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी सुमारे अर्धा तास ध्यानधारणा केली. सत्रानंतर अनेक उपस्थितांनी आपले अनुभव व्यक्त केले. नरेंद्र फडके यांनी हा अनुभव अतिशय वेगळा आणि मन:शांती देणारा होता. असे उपक्रम आजच्या काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले. स्नेहल फडके यांनीही हा उपक्रम आवडल्याचे सांगितले. स्वप्ना देशपांडे यांनी ध्यानामुळे मानसिक व शारीरिक थकवा कमी झाल्याची भावना व्यक्त केली.
मानसिक आणि आत्मिक समाधान
छत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप केळकर यांनी ध्यानाचा अनुभव मनाला भावल्याचे सांगत ध्यानामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार सकारात्मक बनवण्याची ताकद मिळते, असे मत मांडले. या सत्रामुळे उपस्थितांना मानसिक आणि आत्मिक समाधान मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. तसेच हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल जितेंद्र वैद्य आणि नंदकिशोर वैद्य यांचे सर्वांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

