डेरवण गेम्समध्ये ठाणेकरांचा दबदबा
डेरवण गेम्समध्ये ठाणेकरांचा दबदबा
२१ सुवर्णांसह ४० पदकांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : चिपळूण येथील डेरवण येथे ३ ते ६ मार्चदरम्यान पार पडलेल्या डेरवण गेम्स २०२६ स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये ठाणेकरांनी २१ सुवर्ण, आठ रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण ४० पदके पटकावत आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला.
१४ वर्षांखालील गटात स्नेह कामेरकर हिने १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. स्वराज पाटील याने ४०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. तसेच स्नेह, स्वराज, स्पर्श आणि अक्षित या संघाने ४×१०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
१६ वर्षांखालील गटात ध्रुव शिरोडकर याने ४०० मीटरमध्ये रौप्यपदक, तर १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये कांस्यपदके मिळवली. अनिरुद्ध नैंबूद्री याने १०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. याच गटातील ध्रुव, अनिरुद्ध, स्नेह आणि स्वराज या संघाने ४×१०० मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
१८ वर्षांखालील पुरुष गटात गिरिक बंगेरा याने १००० मीटर आणि ४०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक, तर २०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. मानस शिंदे याने १०० मीटर आणि २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक, तसेच ४०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळवले. गिरिक, मानस, ध्रुव आणि विघ्नेश या संघाने ४×१०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. १८ वर्षांखालील महिला गटात कानन देसाई हिने १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर या तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली. तसेच कानन, मायरा, इरा आणि शुभ्रा या संघाने ४×१०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
मिश्र रिले स्पर्धांमध्येही ठाणेकरांनी चमक दाखवली. १६ वर्षांखालील गटात अनिरुद्ध, ध्रुव, इरा आणि शुभ्रा यांनी ४×१०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, तर १८ वर्षांखालील गटात गिरिक, मानस, कानन आणि मायरा या संघाने ४×१०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल योजना प्रमुख मीनल पलांडे आणि अशोक आहेर यांनी सर्व खेळाडू आणि पालकांचे अभिनंदन केले. प्रशिक्षक नीलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

